एरंडोल ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील एका गावातून एका १७ वर्षीय मुलीला एकाने पळवून नेल्याची फिर्याद तिच्या वडिलांनी दिल्यावरून एका विरुद्ध एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या सतरा वर्ष ११ महिन्याच्या मुलीला संशयित शिवाजी हिम्मत पाटील राहणार पिंपरी प्रचा तालुका एरंडोल याने तीन ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास मुलीच्या घरातून तिला पळवून नेल्याची फिर्याद दिल्यावर सात ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पीएसआय शरद बागल करीत आहे.