पोलीस अधीक्षकांचे आदेश
जळगाव (प्रतिनिधी) : पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी जिल्ह्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. यामुळे नवीन अधिकाऱ्यांकडून दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
नियंत्रण कक्षाचे विशाल जैस्वाल यांची जिल्हापेठ पोलीस ठाणे निरीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. तर जिल्हापेठचे निरीक्षक बबन आव्हाड यांची भुसावळ बाजारपेठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती झाली. नियंत्रण कक्षाचे बबन जगताप यांची सायबर पोलीस ठाणे निरीक्षकपदी, नियंत्रण कक्षाचे सुनील पवार यांची पारोळा पोलीस निरीक्षकपदी, नियंत्रण कक्षाचे अनिल भवारी यांची जळगाव शहर पोलीस निरीक्षकपदी, विलास शेंडे यांची जिविशा शाखेत निरीक्षकपदी, जिविशा शाखेचे रंगनाथ धारबळे यांची शनीपेठ पोलीस ठाणे निरीक्षकपदी, सहाय्यक निरीक्षक रुपाली चव्हाण यांची भुसावळ शहर वाहतूक शाखेत नियुक्ती करण्यात आली.