जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील शिरसोली येथील अल्पवयीन तरुणीला अज्ञात इसमाने पळवून नेल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.
शिरसोली गावात राहणाऱ्या पित्याने याबाबत फिर्याद दिली आहे. ते पत्नी, १ मुलगा, १ मुलगी, आई यांचेसह राहतात. शुक्रवारी ४ ऑगस्ट रोजी रात्री घरातील सर्व सदस्य झोपी गेले होते. सकाळी उठल्यावर त्यांना घरातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी दिसून आली नाही. शोधाशोध केली असता ती मिळून आली नाही.
त्यामुळे पित्याने एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध फूस लावून फिर्यादीच्या रखवालीतून पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ जितेंद्र राठोड करीत आहे.