जळगाव (प्रतिनिधी) – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अनेक जागा रिक्त आहेत. परिणामी मनुष्यबळ नसल्याने अनेक अडचणींना रुग्णांसह प्रशासनाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे रिक्त जागा भरल्या जाव्या अशी मागणी विधानपरिषदेत राष्ट्रवादीचे गटनेते आ. एकनाथराव खडसे यांनी केली. तर नियमानुसार मनुष्यबळ भरण्याची कार्यवाही सुरु असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
यावेळी आ. एकनाथराव खडसे म्हणाले जळगाव येथिल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, विविध विभाग प्रमुख तंत्रज्ञ, परिचर, शिपाई इत्यादी अनेक पदे रिक्त आहेत सदर पदे रिक्त असल्याने रूग्णांना वैद्यकीय सेवा उपलब्ध होण्यास रुग्णांना दाखल करून घेण्यास समस्या उद्भवत असुन रुग्णालयातील कार्यरत परिचारिकांवर ,तंत्रज्ञावर कामाचा अतिरिक्त ताण येत असुन रुग्णांच्या शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागत आहेत तसेच काही विभाग बंद करावे लागत आहेत असे असल्यास शासनाने यावर काय उपाययोजना केल्या असा प्रश्न उपस्थित करून शासकीय वैद्यकिय महाविद्यालयातील विविध रिक्त पदे भरण्याची मागणी एकनाथराव खडसे यांनी केली.
या प्रश्नाला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी उत्तर दिले यावेळी ते म्हणाले जळगाव येथिल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, विविध विभाग प्रमुख तंत्रज्ञ, परिचर, शिपाई इत्यादी अनेक पदे रिक्त आहेत परंतु उपलब्ध डॉक्टर कर्मचारी हे रुग्णसेवा बजावत असून उपलब्ध मनुष्यबळा मार्फत रुग्णसेवा सुरळीत सुरू आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, विविध विभाग प्रमुख तंत्रज्ञ, परिचर, शिपाई इत्यादी रिक्त पदे भरण्या बाबत नियमानुसार कार्यवाही सुरू असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.