चोपडा बसस्थानकातील घटना
चोपडा (प्रतिनिधी) – येथील बस स्थानकावर बसमध्ये चढत असताना अज्ञात व्यक्तीने प्रवाश्याच्या खिशातून २० हजार रुपयांची रोकड लांबवल्याचा प्रकार ३१ जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजता घडला. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात राहणारे भैय्यासाहेब विजय पाटील (वय ३४, रा. चोपडा) हे मेडिकल व्यावसायिक असून ते चोपडा बस स्टॅन्ड वरून चोपडा धरणगाव मार्गे जाणाऱ्या जळगाव बस क्रमांक एम एच २० बी एल १४०७ या बस मध्ये चढत होते. यावेळी त्यांच्या डाव्या बाजूला असणाऱ्या खिशातून वीस हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने चोरल्याचा प्रकार लक्षात आला. त्यामुळे भैय्यासाहेब पाटील यांनी चोपडा शहर पोलीस स्टेशनला तात्काळ फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक महेंद्र साळुंखे करीत आहे.