• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावच्या विद्यार्थ्याची “ऑनड्युटी” विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 31, 2023
in Uncategorized
0
जळगावच्या विद्यार्थ्याची “ऑनड्युटी” विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या

मृत वैद्यकीय अभ्यासक्रमाचा विद्यार्थी, मुंबईच्या केईएम हॉस्पिटलमधील घटना

जळगाव (प्रतिनिधी) – येथील डॉ. संजय पाटील यांचा मोठा मुलगा आदिनाथ संजय पाटील याने मुंबई येथे केईएम हॉस्पिटल, मुंबई येथे ऑनड्युटी (कर्तव्यावर) असताना विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती सोमवार ३१ जुलै रोजी समोर आली आहे. मयत आदिनाथ हा वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर पदवीमध्ये शिक्षण घेत होता. त्याची क्षयरोग विभागात ड्युटी लावलेली होती. दरम्यान, पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.

आदिनाथ संजय पाटील (वय २४, रा. एकविरा हॉस्पिटल, आकाशवाणी चौक परिसर, जळगाव) असे त्याचे नाव आहे. तो जळगावातील फिजिशियन डॉ. संजय पाटील, डॉ. स्मिता पाटील यांचा मोठा मुलगा होता. आदिनाथ हा मुंबईच्या केईएम हॉस्पिटल येथे गेल्या ६ वर्षांपासून पदवी व त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण घेत होता. त्याचा लहान भाऊ अजिंक्य हा देखील केईएम हॉस्पिटल येथे पदवीचे वैद्यकीय शिक्षण घेत होता. आदिनाथ पाटील याची क्षयरोग विभागात ड्युटी होती. रविवारी रात्री १ वाजेपर्यंत तो त्याच्या वरिष्ठ डॉक्टरांसह कामावर होता. हसतखेळत असताना त्याने ड्युटी पूर्ण केली.

सोमवारी ३१ रोजी सकाळी कर्मचारी कामावर आल्यावर ८ वाजेच्या सुमारास टीबी विभागाचा दरवाजा आतून बंद दिसला. त्यांनी उघडला असता, आदिनाथ हा बेशुद्धावस्थेत दिसून आला. त्याला तातडीने उपचारार्थ दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मयत घोषित केले. त्याच्या हातावर ३ वेळा इंजेक्शन टोचलेले दिसून येत होते. त्यामुळे त्याने विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. संध्याकाळी ५ वाजता त्याचे शवविच्छेदन पूर्ण झाल्यावर मृतदेह जळगावकडे रवाना करण्यात आला आहे.

दरम्यान, आदिनाथ पाटील हा अत्यंत हुशार विद्यार्थी होता. १२ वि नंतर त्याने दिलेल्या नीट परीक्षेत तो राज्यातून दुसरा तर देशातून ८४ वा आलेला होता. रुग्णालयातही तो हसमुख, मनमिळावू, हुशार, प्रामाणिक विद्यार्थी होता, अशी माहिती केईएम रुग्णालयाचे पदव्युत्तर विभागाचे उप अधिष्ठाता डॉ. हरीश पाठक यांनी “केसरीराज” शी बोलताना सांगितले. आदिनाथच्या मृत्यूमुळे केईएमच्या विद्यार्थाना, शिक्षकांना तसेच पाटील परिवाराला धक्का बसला आहे. आदिनाथने अचानक आत्महत्या का केली, याबाबत काहीच माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान, भोईवाडा पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आलेली आहे.


 

 

Tags: : https://kesariraj.com/susaide-medical-studant-news/#mumbai crime news
Previous Post

तरूणावर चॉपर हल्ला ; शनीपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Next Post

जिल्ह्यात उद्यापासून महसूल सप्ताहाचे आयोजन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आदित्य लॉन्सच्या जागेचा वाणिज्य वापर थांबवण्याचे आदेश

जिल्ह्यात उद्यापासून महसूल सप्ताहाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!
Uncategorized

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!

February 11, 2026
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल
1xbet russia

वाळूचा डंपर सोडण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या जळगावच्या मंडळ अधिकाऱ्यासह तलाठ्याला अटक

February 11, 2026
मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
1xbet russia

मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

February 11, 2026
गांजा पिण्याचा जाब विचारल्याने प्रौढाचा चौघांनी केला खून
1xbet russia

पोलीस भरती प्रक्रियेत कोणत्याही आमिषाला बळी पडू नका

February 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!

February 11, 2026
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल

वाळूचा डंपर सोडण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या जळगावच्या मंडळ अधिकाऱ्यासह तलाठ्याला अटक

February 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon