• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

“केसरीराज”च्या वृत्तानंतर प्रशासन झाले जागे, अखेर एकावर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 30, 2023
in Uncategorized
0
“केसरीराज”च्या वृत्तानंतर प्रशासन झाले जागे, अखेर एकावर गुन्हा दाखल

‘मत्स्यविकास’च्या दुर्लक्षामुळे संशयितांची हिम्मत वाढली : लाखो मांगूर मासे केले नष्ट

जळगाव / जामनेर (प्रतिनिधी) : “मांगूर माशांची पैदास : बुलढाण्यात गुन्हे दाखल तर जळगावात केवळ चौकशीचा फार्स !” या शीर्षकाखाली केसरीराजने शनिवारी २९ रोजी वृत्त प्रसारित केले होते. या वृत्ताची दाखल घेऊन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अधिकाऱ्यांना कारवाईबाबत सूचना दिल्या. त्यानंतर जिल्हा मत्स्य अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस स्टेशनला एका उत्पादकावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

मानवी आरोग्यास धोकादायक असल्याने विक्री, साठवणीसाठी प्रतिबंधित असलेल्या मांगूर जातीच्या तीन टन मासळीची वाहतूक करणारा ट्रक बुलढाणा जिल्ह्यात अकोट-शेगाव रोडवर पोलिसांनी शुक्रवारी २८ जुलै रोजी पकडला. शासकीय अधिकाऱ्यांनी त्यामधील मासळी गौलखेड रोडवरील शेगाव पालिकेच्या डम्पिंग ग्राउंड परिसरात खड्डा खोदून त्यामध्ये नष्ट केली. परप्रांतातील संशयित आरोपींसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या कारवाईतून मिळालेल्या माहितीद्वारे, जळगाव जिल्ह्यात जामनेर तालुक्यातही वाघूर धरणाजवळ ४३ शेततळ्यांद्वारे मांगूर माशांची पैदास केली जात असल्याबाबत समजले होते. त्यानुसार जिल्ह्यातील मत्स्य अधिकाऱ्यांनी कारवाई केली. मात्र केवळ चौकशा करून संशयितांना सोडून दिल्याची माहिती मिळाली होती.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2023/07/VID-20230730-WA0176.mp4

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी वाघूर विभाग अधिकाऱ्यांसह संबंधित विभागांना चौकशी करून कारवाईचे आदेश दिले.वाघूर धरणालगतच्या अनेक शेततळ्यांमध्ये असलेला हा मांगूर मासा स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने खड्डा करून नष्ट करण्यास शनिवारी सुरुवात केली. या वेळी मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद कुदळे, सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी अतुल पाटील, कनिष्ठ लिपिक तुषार वंजारी, वाघुर धरण विभागाचे कनिष्ठ अभियंता एम. एल. पाटील उपस्थित होते. वाघूर धरणालगत असलेल्या शेततळ्यांमध्ये मांगूर माशांचे उत्पादन घेत असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. मात्र पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी काही शेततळ्यांमधील मासे उदगीर येथील मत्स्य विज्ञान महाविद्यालयात तपासणीसाठी पाठवले जात असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त कुदळे यांनी दिली आहे.

दरम्यान, रविवारी ३० जून रोजी जामनेर पोलीस स्टेशन येथे सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी अतुल राजेंद्र पाटील (वय २९, रा. विवेकानंद नगर,पाचोरा) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, वाघुर धरणाच्या बुडीत क्षेत्रात मौजे चिंचखेडा बुद्रुक गावाच्या शिवारात तसेच नेरी बुद्रुक शिवारात मत्स्य व्यवसाय विकास अधिकाऱ्यांनी शुक्रवारी २८ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास पाहणी केली होती.

त्यानुसार एकूण ३ गट क्रमांक मधील २६ शेततळ्यांमध्ये अनधिकृतपणे प्रतिबंधित असलेला विदेशी आफ्रिकन मांगुर जातीचा मासा याचे संशयिताने उत्पादन करण्यासाठी तळे खोदून नुकसान करून मांगुर मासे तयार करून त्याचे संवर्धन करण्यात आले. तसेच ते मासे विक्रीसाठी तयार केले असून त्यामुळे मानवाच्या शरीराला अपायकारक व धोकादायक आजार होऊ शकतो हे माहीत असूनही संशयित आरोपीने आदेशाचे उल्लंघन केले आहे.

त्यानुसार संशयित आरोपी गणतासला नागराज पानदिरीपल्लि गुंडम (रा. कैकलूरु जि. कृष्णा, आंध्र प्रदेश) याच्या विरोधात अन्नसुरक्षा मानके अधिनियम यानुसार जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील हे करीत आहेत.


 

Previous Post

जळगाव एलसीबीकडून चोरीच्या पाच दुचाकींसह अट्टल चोरटा जेरबंद

Next Post

मुलांना मोबाईल व्यसनापासून ठेवा दूर…

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मुलांना मोबाईल व्यसनापासून ठेवा दूर…

मुलांना मोबाईल व्यसनापासून ठेवा दूर...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध
1xbet russia

“जिल्हा परिषद आपल्या दारी” उपक्रमांतर्गत यावल येथे सोमवारी तक्रार निवारण सभा

June 21, 2025
शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १८०० विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग!
1xbet russia

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १८०० विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग!

June 21, 2025
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय आणि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध

“जिल्हा परिषद आपल्या दारी” उपक्रमांतर्गत यावल येथे सोमवारी तक्रार निवारण सभा

June 21, 2025
शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १८०० विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग!

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १८०० विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग!

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon