• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शेतजमिनीच्या वादातून दोन गटात सशस्त्र हाणामारी, पितापुत्राचा गोळीबारात मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 28, 2023
in खान्देश, महाराष्ट्र
0
शेतजमिनीच्या वादातून दोन गटात सशस्त्र हाणामारी, पितापुत्राचा गोळीबारात मृत्यू

नंदुरबार जिल्ह्यातील मलगाव येथील घटना

नंदुरबार (प्रतिनिधी) : जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील मलगाव येथे गुरुवारी सकाळी शेतजमिन मालकी हक्काच्या वादातून कुटुंबातील दोन गटात हातात शस्त्रे घेऊन हिंसक हाणामारी झाली. एकाने तर गावठी बंदुकीतून गोळीबार केल्याने पिता पुत्र दगावले असून दोन्ही गटातील सहा जण जखमी झाले आहेत. एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्यास पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शहादा पोलिस स्टेशनला सदोष मनुष्य वधासह, वधाचा प्रयत्न करणे या गुन्ह्यासह विविध कलमान्वये परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहे. काही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मलगाव येथे आदिवासी बांधवांना वन जमिनीचे पट्टे मिळाले आहेत. यातील एका वन जमिनीच्या पट्ट्यावरून कुटुंबातील दोन गटात मालकी हक्काचा सुरु वाद होता. यातील एक गटाच्या ताब्यात जमीन असल्याने ते ती जमीन कसत होते. मात्र ती जमीन आपल्या आजोबांना मिळाली असल्याने ती आपल्याला मिळावी असा आग्रह दुसऱ्या गटाचा होता. अश्यातच दुसऱ्या गटाने आज सकाळी शेतात जाऊन शेत ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. शेतात कामे करीत असताना दुसरा गट तेथे आला. त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची होऊन दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत लोखंडी सळ्या, पाईप, लाकडी दांडे व एक गावठी बंदुकीचा सर्रास वापर करण्यात आला. हाणामारीत एका गटातील संशयिताने समोरासमोर गोळीबार केल्याने मलगाव येथील अविनाश सुखराम खर्डे (वय २३ वर्षे) व सुखराम कलजी खर्डे ( वय ४२ वर्षे) यांच्या छातीत व पोटात गोळ्या लागल्या. यात अविनाश खर्डे याचा जागीच मृत्यू झाला तर सुखराम खर्डे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या संदर्भात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. पहिल्या गुन्ह्यात, देविदास रायसिंग खर्डे (वय३० वर्षे) रा. मलगाव ता. शहादा यांच्या फिर्यादीवरून सुनील राजेन्द्र पावरा रा. बेडिया ता. पानसेमल (मध्यप्रदेश), गणेश दिवान खर्डे रा. मलगाव, सोनिबाई गणेश खर्डे रा. मलगाव, अरुण राजेंद्र पावरा रा. बेडिया, ललिताबाई राजेंद्र पावरा रा. बेडिया, रमिबाई दिवान खर्डे रा. मलगाव यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सकाळी १० वाजेच्या सुमारास शेतात शेतीच्या वादातून हातात लोखंडी सळ्या, लाकडी दांडके व गावठी बंदूक घेऊन हमला केल्याचे नमूद करण्यात आले आहे. बंदुकीतून गोळीबार केल्याचे नमूद करण्यात आले आहे. यात सुखराम कलजी खर्डे हा जखमी झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. ज्याचा नंतर मृत्यू झाला आहे. रायसिंग कलजी खर्डे (वय ५० वर्षे, रा. मलगाव) हे जखमी झाले आहेत. आरोपींच्या विरोधात मनुष्य वध, वधाचा प्रयत्न, भारतीय हत्त्यार कायदा कलमांसह इतर कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दुसरी फिर्याद सोनिबाई गणेश खर्डे ( वय ३० वर्षे) रा. मलगाव यांनी दिली आहे. यात आरोपी सुखराम कलजी खर्डे, अविनाश सुखराम खर्डे, रायसिंग कलजी खर्डे, ममता सखाराम खर्डे, शकुंतला रायसिंग खर्डे, देहू उर्फ देविदास रायसिंग खर्डे, भावश्या उर्फ निलेश रायसिंग खर्डे व जगदीश रायसिंग खर्डे सर्व रा. मलगाव यांचे विरोधात हातात लोखंडी सळ्या व दांडे घेऊन प्राणघातक हमाला केल्याचे नमूद करण्यात आले आहे. यात गणेश दिवान खर्डे, सुनील राजेन्द्र पावरा, अरुण राजेंद्र पावरा दोन्ही रा. बेडिया व रामिबाई दिवाण खर्डे रा. मलगाव हे जखमी झाले आहेत. सर्व जखमी हे नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनात शहाद्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, सपोनि प्रतापसिंग मोहिते यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. रात्री उशिरा पर्यंत पोलिसांची कारवाई सुरु होती. तर आरोपींचे अटकसत्र सुरु होते. या घटनेतील गोळीबार करणारे आरोपी मध्यप्रदेश राज्यातील असल्याचे व त्यांनी गावठी बंदूक तेथूनच आणल्याचे समजत आहे.


 

 

Previous Post

शिवाजी नगरात पुन्हा खळबळ, पूर्ववैमनस्यातून घरावर बेछुट गोळीबार !

Next Post

तीन वर्षांपूर्वीचे प्रकरण, न्यायालयाच्या आदेशान्वये दोघांवर खुनाचा गुन्हा !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
तीन वर्षांपूर्वीचे प्रकरण, न्यायालयाच्या आदेशान्वये दोघांवर खुनाचा गुन्हा !

तीन वर्षांपूर्वीचे प्रकरण, न्यायालयाच्या आदेशान्वये दोघांवर खुनाचा गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
1xbet russia

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

June 11, 2026
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

सुभाष चौकातून महागडा  मोबाईल चोरी ; शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 11, 2026
गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांचे यश  
1xbet russia

गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांचे यश  

June 11, 2026
यावल तालुका मोतीबिंदूमुक्त अभियानास प्रारंभ; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे
1xbet russia

यावल तालुका मोतीबिंदूमुक्त अभियानास प्रारंभ; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे

June 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

June 11, 2026
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल

सुभाष चौकातून महागडा  मोबाईल चोरी ; शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon