जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील गोलाणी मार्केट परिसरातील मोबाईल दुकान फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती वरून, विनीत कैलासकुमार अहुजा (वय-३१) रा. गणेश नगर, जळगाव हा तरूण परिवारासह राहायला आहे. त्याचे शहरातील गोलाणी मार्केट परिसरात श्री एसएसडी नावाचे मोबाईल दुकान आहे. १८ जुलै रोजी मध्यरात्री अज्ञात दोन चोरट्यांनी मोबाईल दुकानाचे गच्चीवरील लोखंडी गेटचे कूलूप तोडून गॅलरीतून प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील सामानांची चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. याप्रकरणी दुकान मालक विनीत अहुजा यांनी शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून गुरूवारी २० जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ उमेश भांडारकर करीत आहे.