चाळीसगाव शहरात पोलिसांची कारवाई
चाळीसगाव (प्रतिनिधी) – चाळीसगाव शहरात मध्यरात्री घरफोडीच्या उद्देशाने फिरत असलेल्या चोरट्याला गस्तीपथकाला मिळुन आला. पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे दिड फुट लांबीची लोखंडी टॉमी जप्त केली आहे. त्याच्यावर याआधीही गुन्हे दाखल आहे. त्याला ताब्यात घेवून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
चाळीसगाव पोलिसांचे पथक रविवारी रात्री पेट्रोलिंग करीत असतांना, शहरातील पवारवाडी, हिरापुर रोड भागात राजहंस थिएटरसमोर एक इसम त्याचे चेहर्यावर रुमाल बांधुन संशयास्पदरित्या फिरतांना दिसला. गस्तीवर असलेले पोना. महेंद्र पाटील, पोना. भुषण पाटील, पोशि. रविंद्र बच्छे, पोशि.समाधान पाटील, पोशि. विजय पाटील, पोशि. राकेश महाजन, पोशि. आशुतोष सोनवणे, पोकॉ. पवन पाटील, पोकॉ. ज्ञानेश्वर पाटोळे यांनी लागलीच नियोजनबध्द रित्या सापळा रचुन संशयित आरोपी मोहम्मद फातीर उर्फ गोल्या मियातुबल मोहम्मद (वय १९, रा. इस्लामपुरा, जामनेर ता. जामनेर) यास ताब्यात घेतले.
त्याची चौकशी केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली व त्याची अंगझडती घेता त्याचे जवळ सुमारे दिड फुट लांबीची लोखंडी टॉमी मिळुन आली. सदर इसमाविरोधात भुसावळ बाजारपेठ येथे ३ घरफोडीचे गुन्हे तसेच जामनेर पो. स्टेशनला १ घरफोडीचा गुन्हा दाखल असल्याची माहीती मिळुन आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला पोकॉ रविंद्र बच्छे यांचे फिर्यादीवरुन गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोना राहुल सोनवणे, पोकॉ ज्ञानेश्वर पाटोळे हे करीत आहेत.