पाचोरा तालुक्यातील तारखेडा येथील घटना
पाचोरा (प्रतिनिधी) – तालुक्यातील तारखेडा खुर्द येथील २७ वर्ष वयाच्या कंत्राटी वायरमनने ४ जुलै मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान घराच्या छताला दोर गळ्याला लावून आत्महत्या केली. घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हर्षल जुलाल पाटील (वय २७, रा. तारखेडा खुर्द ता. पाचोरा) असे मयताचे नाव आहे. मयताचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी केले. हर्षल जुलाल पाटील हे गेल्या दोन वर्षांपासून वीजवितरण कंपनीत कंत्राटी वायरमन म्हणून सेवेत होते. मंगळवारी दुपारी दोन वाजता आई, वडील शेतात काम करुन घरी आले असता हर्षल जुलाल पाटील याने घराचा लोखंडी दरवाजा बंद करून व लाकडी दरवाजा उघडा ठेवून छताला गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आईस आढळून आले.
त्यानंतर आरडाओरड सुरू झाल्यानंतर गल्लीतील यूवकांनी त्यांना खाली उतरविले. मयताचे पश्चात आई, वडील, एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. हर्षल पाटील यांच्यावर सायंकाळी तारखेडा खुर्द येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तारखेडा गावावर शोककळा पसरली आहे.