पंतप्रधान मोदींची केली स्तुती, राष्ट्रीय कार्याध्यक्ष पटेलदेखील बाहेर पडले
मुंबई (प्रतिनिधी) – शिवसेना शिंदे-भाजप सरकार यांच्याकडे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच आम्ही सामील होणार आहोत. पक्षाच्याच चिन्हाखाली आम्ही आगामी निवडणूक लढविणार आहोत. आम्हाला मिळेल त्या खात्यात आम्ही करणार आहोत. जर आम्ही शिवसेनासोबत मागील काळात सोबत गेलो तर पुढील काळातही भाजपसह काम करू शकतो, अशी माहिती राज्याचे नवनिर्वाचित सातवे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राजभवनात रविवारी २ जुलै रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा पवार यांनी सातव्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. तर त्यांच्यासह ९ जनांनीदेखील शपथ घेतली. त्यानंतर अजित पवार हे पत्रकारांशी बोलताना म्हणाले कि, आज काही सदस्य पोहोचू शकले नाही. काही जण परदेशात आहेत. तेदेखील सोबत येणार आहेत. मंत्रिमंडळाचा आणखी विस्तार होणार आहेत. वरिष्ठ पातळीवर आम्ही एकत्र बसायचो. त्यावर चर्चा करीत होते. मोदींच्या नेतृत्वाखाली देश पुढे जात आहेत. मोदींच्या कामाला पाठिंबा दिला पाहिजे, असा आमचा निर्णय झाल्याचे अजित पवार म्हणाले.
देशातील विरोधी पक्षांची बैठक एकत्र होत होती. मात्र त्यात आउटपुट काहीही निघत नव्हते. मी शुक्रवारी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला, असे सांगून अजित पवार यांनी, तरुणांना संधी देणे महत्वाचे आहे. आगामी काळात तरुणांना पुढे आणणे गरजेचे आहे असे सांगितले. पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल,नवीन मंत्री छगन भुजबळ आदी उपस्थित होते.
आपण कामाशी मतलब ठेवत असतो. महाराष्ट्राचा विकास करणे हे ध्येय आहे. बहुतेक आमदारांना हा निर्णय मान्य आहे. पक्षाचे सर्व आमदार, खासदार आमच्यासोबत आहेत, तसेच, सर्वांचा आशीर्वाद आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.