जळगाव ;- गडचिरोली जिल्ह्यातील उपविभाग अहेरी अंतर्गत मुलचेरा पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीने पतीच्या सर्व्हिस रिव्हॉल्वरने डोक्यात गोळी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना येथे घडली आहे. पोलीस उपनिरीक्षक धनराज शिरसाट यांची पत्नी संगिता शिरसाठ (वय २८) ने आज दुपारी साडेबारा ते १ वाजे दरम्यान गोळी मारून आत्महत्या केली .
सूत्रांच्या माहितीनुसार मुलचेरा पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक धनराज शिरसाठ कार्यरत आहे. त्यांच्यासोबत पत्नी आणि आईवडील दोन मुले वास्तव्याला होते. आज धनराज शिरसाठ हे काही कामानिमित्त आपल्या आई वडिलांसोबत बाहेर गेले होते . यावेळी घरी पत्नी संगीता भार्गर्वी (वय ९) आणि शुभम (४) घरात होते . दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास संगिता शिरसाठ यांनी आपल्या डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली . गोळीचा आवाज ऐकल्यानंतर भार्गवी हिने आरडाओरड केली . यावेळी त्या ठिकाणी असणाऱ्या काही पोलीस कर्मचाऱ्यांनी तिला चंद्रपूरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले . मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले . दरम्यान या प्रकारची माहिती गडचिरोली पोलीस घेत असून खरा प्रकार काय आहे हे लवकरच उघड होईल असे पोलीस सूत्रांनी सांगितले.