जळगाव शहरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) – रिक्षामध्ये प्रवासी बसवण्याच्या कारणावरून तीन ते चार जणांनी रिक्षा चालकाला चापटा बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली. म्हणून जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देविदास सोमनाथ कोळी (वय ६३, रा. शिवाजीनगर,हुडको, जळगाव) याने फिर्याद दिली आहे. देविदास कोळी हे गुरुवारी २२ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास रेल्वे स्टेशन परिसरातील डॉ. आंबेडकर पुतळाजवळ रिक्षामध्ये प्रवासी बसवीत होते. त्यावेळी वाईट वाटून हैदर अली उर्फ मुन्ना, इर्शाद अली (दोन्ही रा. तांबापुर, जळगाव) आणि अन्य दोन जण यांनी त्यास चापटा बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली.
देविदास कोळी यांनी जळगाव शहर पोलीस स्टेशनला धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून गुरुवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल करीत आहेत.