अमळनेर (प्रतिनिधी) – शहरातील प्रताप मिल कम्पाउंड परिसरात चोरटय़ाने घरफोडी करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना २० रोजी रात्री घडली. याबाबत अंमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील प्रताप मिल कंपाऊंड परिसरात कैलास शांताराम बिरारी यांच्या घरी दि. २० रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी घराचा मागचा दरवाजा कडी कोंडा तोडून घरातील कपाटात असणाऱ्या सुमारे १७ ग्रॅम वजनाचे ४२ हजार ५०० रुपये किंमत असलेली मंगल पोत, व चार ग्रॅम वजनाची १० हजार रुपये किंमत असलेले सोन्याचे कानातील कर्णफुले व खिशातील नऊ रुपये रोख असा ६१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याबाबत अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादवी अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील हटकर करीत आहेत.