जळगाव जिल्ह्यातील ४ तालुका अधिकाऱ्यांसह २७ जणांचा समावेश
विशेष प्रतिनिधी
जळगाव : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आरोग्य सेवा आयुक्तालयातर्फे ७ किंवा ७ पेक्षा अधिक वर्षे सेवा झाली आहे अशा राज्यातील तब्बल १२९२ डॉक्टरांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील २३ वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश असून ४ तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांचीही बदली झाली आहे. या डॉक्टरांना नवीन बदलीच्या ठिकाणी तत्काळ घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता कारेगावकर यांच्या सहीनिशी या बदल्यांचे आदेश जारी झाले आहे. महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट ब या संवर्गातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात आली आहे. सदर बदली झालेल्या आरोग्याधिकार्यांना तत्काळ कार्यमुक्त करण्याच्या सूचना जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्याधिका-यांना देण्यात आल्या आहेत.
बदल्या झालेले वैद्यकीय अधिकारी
राजाराम पंढरीनाथ देशमुख (दंतशल्यचिकित्सक, उपजिल्हा रुग्णालय, जामनेर येथून ग्रामीण रुग्णालय पहूर येथे), मिलिंद शामराव बारी (बालरोग तज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय, जळगाव येथून महिला रुग्णालय, मोहाडी), मनोज मंगल पाटील (बालरोग तज्ज्ञ, उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथून महिला रुग्णालय मोहाडी येथे), रवींद्र कडू पाटील (स्त्रीरोग व प्रसूती शास्त्र, उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथून जिल्हा रुग्णालय जळगाव येथे), वैदेही माधव पंडित (स्त्रीरोगतज्ज्ञ, ग्रामीण रुग्णालय मेहुणबारे, चाळीसगाव येथून ग्रामीण रुग्णालय, चाळीसगाव येथे), डॉ. नीता गोपाळ बेंडाळे-भोळे (स्त्रीरोग तज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय जळगाव येथून महिला रुग्णालय, मोहाडी येथे), डॉ. प्राची सुरतवाला (भूलशास्त्र, जिल्हा रुग्णालय, जळगाव येथून महिला रुग्णालय मोहाडी येथे), डॉ. सचिन अहिरे, जिल्हा रुग्णालय जळगाव येथून उपजिल्हा रुग्णालय, चोपडा येथे), पंकज रामन पाटील (अस्थिरोग, उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथून जिल्हा रुग्णालय जळगाव येथे). विजय कुरकुरे (जिल्हा रुग्णालय, जळगाव येथून जिल्हा रुग्णालय,नंदुरबार येथे)
नितीन सुभाष विसपुते (कान नाक घसा, जिल्हा रुग्णालय जळगाव येथून उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथे), वैशाली पद्मसिंग चांदा (कान नाक घसा, उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथून जिल्हा रुग्णालय जळगाव येथे), तृप्ती वसंत पाटील (नेत्रतज्ज्ञ,उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथून फिरते नेत्र पथक चोपडा येथे).
आयुर्वेदिक तज्ज्ञ : योगेंद्र आनंदराव पवार (प्राथमिक आरोग्य केंद्र वैजापूर ता. चोपडा येथून प्राथमिक आरोग्य केंद्र, उंदीरखेडा, पारोळा) येथे, डॉ. शितल श्रीकृष्ण चव्हाण (प्राथमिक आरोग्य केंद्र, तांदलवाडी ता. रावेर येथून प्राथमिक आरोग्य केंद्र मोहगाव हिंगणा ता. रावेर), चंद्रशेखर दत्तात्रय पाटील (प्राथमिक आरोग्य केंद्र, सातगाव डोंगरी ता.पाचोरा येथून प्राथमिक आरोग्य केंद्र बदरखे ता. पाचोरा), डॉ. संजय पुरुषोत्तम रनाळकर (प्राथमिक आरोग्य केंद्र, उंदीरखेडा ता. पारोळा येथून प्राथमिक आरोग्य केंद्र वडोदा ता. चोपडा येथे), प्रवीण सुधाकर देशमुख (प्राथमिक आरोग्य केंद्र चांगदेव ता. मुक्ताईनगर ते प्राथमिक आरोग्य केंद्र तांदलवाडी ता. रावेर येथे), दिनेश पुंडलिक निळे (प्राथमिक आरोग्य केंद्र वडोदा ता. चोपडा येथून प्राथमिक आरोग्य केंद्र वैजापूर ता.चोपडा येथे).
तालुका आरोग्य अधिकारी : डॉ. समाधान बाबूलाल वाघ (तालुका आरोग्य अधिकारी, पाचोरा येथून भडगाव येथे), सुचिता गोविंदराव एकडे (तालुका आरोग्य अधिकारी, भडगाव येथून प्राथमिक आरोग्य केंद्र कजगाव ता. भडगाव येथे), डॉ. संजय दगडू चव्हाण (तालुका आरोग्य अधिकारी, जळगाव येथून तालुका आरोग्य अधिकारी धरणगाव येथे), डॉ. मनोज वसंतराव चौधरी (तालुका आरोग्य अधिकारी, बोदवड येथून तालुका आरोग्य अधिकारी एरंडोल येथे).
याशिवाय सागर गुलाबराव नाशिककर (प्राथमिक आरोग्य केंद्र म्हसावद ता. जळगाव येथून प्राथमिक आरोग्य केंद्र उरुळी कांचन, हवेली जि. पुणे येथे), डॉ. गिरीश शांताराम चौधरी (ग्रामीण रुग्णालय धरणगाव येथून महिला रुग्णालय, मोहाडी येथे), डॉ. प्राजक्ता हरीश चव्हाण (प्राथमिक आरोग्य केंद्र, भालोद ता. यावल येथून प्राथमिक आरोग्य केंद्र पाडळसे ता. यावल येथे) प्रशांत साहेबराव बोरसे (प्राथमिक आरोग्य केंद्र कजगाव ता. भडगाव येथून तालुका आरोग्य अधिकारी, चाळीसगाव येथे नियुक्ती).