आमदार अनिल पाटील यांचं आवाहन
अमळनेर ;- तालुक्यात कोविंड 19 चे 18 पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर, अमळनेर तालुक्यात व शहरात एकूण रुग्ण संख्या 47 वर गेली आहे. ही तालुक्यासाठी अत्यंत धोक्याची घंटा आहे ही कोरोनाव्हायरस ची साखळी थांबवन्यासाठी आज पासून जनता कॅरफू पाच दिवस पूर्ण तालुक्यात लागू केला जाणार आहे. ही संचारबंदी यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी पोलीस आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन आमदार अनिल भाईदास पाटील यांनी केले आहे.
भाजीपाला, किराणा, मेडिसिन व इतर कुठल्याही कामाच्या निमित्ताने बाहेर पडू नये तसेच आपण बाहेर पडल्यास प्रशासन कडक कारवाई करेल असे आदेश देण्यात आले आहेत. अंमळनेर प्रशासनाला अतिरिक्त मदत होण्यासाठी उपजिल्हाधिकारी व अप्पर पोलीस अधीक्षक यांच्यासह अतिरिक्त पोलीस फौज फाटा देखील अंमळनेर मध्ये आता तळ ठोकून राहतील
शहरांमध्ये आपल्या वार्डात कोणीही बाहेरून येणार नाही व कोणी बाहेर पडणार नाही व गाव पातळीवर देखील याच पद्धतीने आपण दक्षता घ्यावी असे सर्व नागरिकांना जाहीर आवाहन आमदार अनिल भाईदास पाटील यांनी केले आहे.
सर्वांनी सतर्क राहून आपापल्या गावात व वार्डात बारकाईने या सर्व बाबींवर लक्ष घालावे आणि प्रशासनाला मदत करावी, असेही ते म्हणाले