एलसीबीची भुसावळ तालुक्यात धडक कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : भुसावळ तालुक्यातील कंडारी येथून दोन इसमांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने घातक हत्यारांसह अटक केली आहे. त्यांच्यावर वरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कंडारी गावी ता. भुसावळ येथील मयुर नारायण मोरे याचे राहते घरी विना परवाना बेकायदा गावठी पिस्तोल मॅगझीन काडतुसासह तलवारी बाळगून दहशत निर्माण करीत असले बाबत पोलिसांना बातमी मिळाली होती. पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखे कडील पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, सहा. पोउनि अनिल जाधव पोह कमलाकर बागुल, अनिल देशमुख, जयंत चौधरी, महेश महाजन, दिपक पाटील, पोना श्रीकृष्ण देशमुख, महेश सोमवंशी, ईश्वर पाटील अशांचे पथक नेमण्यात आले होते.
पथकाने हतनुर ता. भुसावळ येथून मयुर नारायण मोरे (वय २६) व कल्पेश राजु मोरे (वय २२ वर्षे रा. कंडारी ता. भुसावळ) हे अवैधरित्या गावठी पिस्तोल मॅगझीन काडतूसह ०५ तलवारी सह मिळून आल्याने पुढील कारवाई करीता वरणगाव पो.स्टे. चे ताब्यात देण्यात आले आहे.