जळगाव (प्रतिनिधी) – दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या चार संशयित चोरट्याना एमआयडीसी पोलीस स्टेंशनच्या कर्मचाऱ्यांनी शिताफीने गजाआड केले आहे. त्यांच्याकडून पिस्टल, काडतूस, चाकू, मिरची पूड आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे.
अजिंठा चौफुलीच्या पुढे एस. टी वर्कशॉप जवळ अंधारात काही ईसम हे मोटार सायकली घेऊन उभे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या ठिकाणी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोना हेमंत कळसकर, चंद्रकात पाटील, प्रदीप पाटील, दिपक चौधरी, अशपाक शेख अशांनी मध्यरात्री ३ वाजता रस्ता लुट व दरोडयाच्या प्रयत्नात असलेले स्वप्नील उर्फ गोल्या धर्मराज ठाकुर, (वय-१९ वर्षे), निशांत प्रताप चौधरी (वय १९ वर्षे, दोन्ही रा. शंकरराव नगर, डीएनसी संस्थेच्या कॉलेजजवळ), पंकज चतुर राठोड (वय- १९ वर्षे, रा. तुकारामवाडी जळगाव), यश देवीदास शंकपाळ (वय १९ वर्षे, रा. हरिओम नगर, आसोदा रोड) दोन अल्पवयीन यांना ताब्यात घेतले होते.
त्यांच्याजवळ गावठी बनावटचे पिस्टल, चाकु, मिरचीची पुड, दोर, ३ जिवंत काडतुस, दोन मोटार सायकली असे दरोड्याकामी लागणारे साहीत्य मिळुन आले होते. सदरचे आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन स्वप्नील उर्फ गोल्या धर्मराज ठाकुर याच्यावर ५ गुन्हे, निशांत प्रताप चौधरी याच्यावर ५ गुन्हे, यश देवीदास शंकपाळ याच्यावर ०१ गुन्हा दाखल आहे. सदर बाबतीत एमआयडीसी पोस्टे ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ४ आरोपी यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोउनी आनंदसिंग पाटील, पोना योगेश बारी हे करीत आहेत.