जामनेर ( प्रतिनिधी ) – गोदावरी फाऊंडेशन संचिलत केंद्र शासन मान्य संकल्प व्यसनमुक्ती केंद्रातर्फे नांद्राहवेली येथे शनिवार दि.१३ मे रोजी भव्य व्यसनमुक्ती शिबिराचे आयोजन केले आहे.
नांद्राहवेली येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत उद्या सकाळी १० ते २ या वेळेत शिबिर होणार आहे. या शिबिरात तज्ञ डॉक्टरांद्वारे व्यसनमुक्ती विषयी मार्गदर्शन व उपचार केले जाणार आहे. ज्यांना दारु सोडण्याची इच्छा असेल अशांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी नितीन पाटील, राधेशाम खवले, अतुल महाजन यांच्याशी संपर्क साधावा.
केंद्र शासनमान्य संकल्प व्यसनमुक्ती केंद्रात १५ दिवसात अत्यल्प दरात दारु सोडविली जाते. या केंद्रात स्वतंत्र वॉर्ड असून तेथे अॅडमिट राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तज्ञ डॉक्टर्स, समुपदेशक, प्रशिक्षीत नर्सिंग स्टाफ येथे आहे. योगा, ध्यानधारणेसह मनोरंजन असे विविध उपक्रम व औषधोपचाराद्वारे दारु सोडविली जाते. याशिवाय रुग्णांना भोजनही येथे दिले जाते. मागील दिड महिन्यात ५० हून अधिक जणांची दारु सोडविण्यात संकल्प व्यसनमुक्ती केंद्राला यश आले. अधिक माहितीसाठी डॉ. आदित्य यांच्याशी ९४०४४७६१११ या क्रमांकावर संपर्क साधावा.