• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

परभणी येथे होणार अखिल भारतीय मराठी गझल संमेलन

जळगावातील ५ गझलकारांचा विविध सत्रांत सहभाग

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 11, 2023
in Uncategorized
0
परभणी येथे होणार अखिल भारतीय मराठी गझल संमेलन

जळगाव (प्रतिनिधी) – मराठी गझल क्षेत्रात गेली अनेक वर्षे कार्यरत असणारी गझल मंथन साहित्य संस्था आणि गंगाखेड येथील मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने, मराठी गझलेचा प्रचार, प्रसार व्हावा म्हणून ह्या हेतूने दि. १३ व १४ मे २०२३ रोजी गंगाखेड शहरात दोन दिवसीय अखिल भारतीय मराठी गझल संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे. संमेलनात जळगाव जिल्ह्यातील ५ जण सहभागी होणार आहे. तसेच, विविध सत्रात सहभागी होणार आहे.

गझल मंथन साहित्य संस्था ही साहित्य चळवळीत कार्यरत असलेली संस्था असून संस्थेने आतापर्यंत, उस्मानाबाद(धाराशिव),शहादा,नंदुरबार,लातूर, धुळे, रत्नागिरी, जालना,चंद्रपुर,पुणे, पनवेल, ठाणे, जळगांव, मुंबई अशा विविध ठिकाणी, मराठी गझल मुशायरे, कार्यशाळा, मार्गदर्शन शिबिरे, पुस्तक प्रकाशने आयोजित केलेली आहेत. याचसोबत गझलेचे ऑनलाईन मार्गदर्शन, गझलेला वाहिलेले फेसबुक पेज, युट्युब चॅनेल याद्वारे गझल गायकांद्वारे गझलेला स्वरसाज देवून गझलप्रसाराचे काम जोमाने पर पाडले जात आहे. यावेळी पहिल्यांदाच गझल मंथन संस्था ही मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठान ह्या नावाजलेल्या संस्थेसोबात संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय गझल संमेलन आयोजित करत आहे जिथे महाराष्ट्रातील नावाजलेल्या आणि गझल क्षेत्रातील दिग्गज साहित्यिकांचे विचार, गझल आणि मैफिल ऐकण्याची दुर्मिळ संधी रसिकांना उपलब्ध होत आहे.

ह्या दोन दिवसीय संमेलनांत मराठी गझल संग्रह आणि काव्यसंग्रहांचे प्रकाशन, गझलेतील प्रतिष्ठेचा ‘ जीवन गौरव’ पुरस्कार प्रदान सोहळा, निमंत्रितांचा गझल मुशायरा, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गझलकाराची प्रकट मुलाखत, गझलेतील विविध ज्वलंत विषयांना अनुसरून आयोजित केलेला दिग्गज साहित्यिकांचा परिसंवाद, सुप्रसिद्ध गायक श्री. संकेत नागपुरकर यांच्या सुश्राव्य गझल गायनाची मैफिल आहे. संमेलनात जळगाव येथील गझलकार डाॅ. ज्ञानेश पाटील, ॲड. मुकुंदराव जाधव, चाळीसगांव येथिल छाया बैसाणे, शिवाजी साळुंखे निमंत्रित गझलकार म्हणून सहभागी होणार आहेत.

गंगाखेड मतदारसंघाचे विद्यमान आ. डॉ. रत्नाकर गुट्टे हे ह्या दोन दिवसीय संमेलनाचे उद्घाटक तथा स्वागताध्यक्ष आहेत, संमेलनाचे प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध गझलकार नितिन देशमुख(अमरावती) ह्यांची उपस्थिती राहणार आहे. पुणे येथील सुप्रसिद्ध कवी व गझलकार श्री. प्रमोद खराडे हे ह्या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. उद्घाटन समारंभाला सुप्रसिद्ध कवी तथा ज्येष्ठ गझलकार श्री. म. भा. चव्हाण ( पुणे), डॉ. ज्ञानेश पाटील ( जळगांव) यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे. संमेलनात महाराष्ट्रातील काही नामवंत निमंत्रित गझलकारांचा मुशायरा असणार आहे यात प्रशांत वैद्य (ठाणे), अमोल शिरसाट(आकोला),दर्शन शहा (हैद्राबाद),प्रा. सिद्धार्थ भगत (यवतमाळ) यांचा सहभाग राहणार आहे.

संमेलनाला अनिल कांबळे – अध्यक्ष गझलमंथन साहित्य संस्था, वसुदेव गुमटकर – उपाध्यक्ष, जयवंत वानखडे-सचिव, उमा पाटील सहसचिव,भरत माळी प्रसिद्धि प्रमुख, खान्देश उपविभाग प्रमुख ॲड. मुकुंदराव भाऊराव जाधव, जळगांव, यांसोबतच, हनुमंत मुंढे – अध्यक्ष मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठान, ॲड. मिलिंद क्षीरसागर- सचिव, हनुमंत लटपटे, राजेभाउ बापू सातपुते – सदस्य या पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थित असणार आहेत. संमेलन यशस्वी होण्यासाठे विविध समित्या गठित केलेल्या असून, श्री. यशवंत मस्के हे संमेलन नियोजन समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांचेसोबत कवी विठ्ठल सातपुते, आत्माराम जाधव, डॉ. अविनाश कासाडे, प्रा. दीनानाथ फुलवाडकर, रत्नाकर जोशी, आत्तम गेंदे, एम.एम. नागरगोजे,संजय तिडके, गणेश नरवटे , दिवाकर जोशी, महेश होनमाने, सिद्धेश्वर इंगोले, शिवशंकर डोईजड हे सम्मेलनाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेत आहेत.

संमेलनात महाराष्ट्रभरातील गझलकार, रसिक तथा साहित्यप्रेमींना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत असून ह्या दोन दिवसीय संमेलनाला गझल मंथन साहित्य संस्थेचे मार्गदर्शक समिती सदस्य डॉ. कैलास गायकवाड,डॉ. शिवाजी काळे,निलेश कवडे स्नेहल कुलकर्णी, डॉ. संतोष कुलकर्णी, डॉ. राज रणधीर,शांताराम(शाम) खामकर समीर बापट, उर्मिला बांदिवडेकर यांनी उपस्थिती सुद्धा राहणार आहे. गंगापूरकरांना प्रसिद्ध गायक संकेत नागपुरकर यांची गझल मैफिल अनुभवायला मिळणार आहे.

संमेलनात जळगाव येथील गझलकार डाॅ. ज्ञानेश पाटील, ॲड. मुकुंदराव जाधव, चाळीसगांव येथिल छाया बैसाणे, शिवाजी साळुंखे निमंत्रित गझलकार म्हणून सहभागी होणार आहेत.


 

 

Tags: #parbhani gazal samelan newshttps://kesariraj.com/11-may-23-n-6/
Previous Post

विधानसभा अध्यक्षांसमोर होणार शिंदे सरकारची खरी परीक्षा

Next Post

बसमध्ये चढताना महिलेचे १ लाख १२ हजाराचे दागिने लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बंद घर फोडून दागिन्यांसह मोबाईलची चोरी ; गुन्हा दाखल

बसमध्ये चढताना महिलेचे १ लाख १२ हजाराचे दागिने लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका
1xbet russia

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार
1xbet russia

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

July 21, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगावात डॉक्टरांच्या दवाखान्यासमोरून दुचाकी चोरी

July 21, 2026
अंगावर काटा आणणारी घटना : पतीने पत्नीच्या अंगावर कार नेऊन केले गंभीर जखमी !
1xbet russia

कजगावात घरफोडी; रोकडसह सोन्याचे दागिने लंपास

July 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

July 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon