अमळनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील मारवड येथील ३० वर्षीय तरुणाचा अकस्मात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दि. ७ मे रोजी सायंकाळी घडली आहे. मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
महारू नामदेव पाटील (वय ३०) हा तरुण मिस्तरी काम करून उदरनिर्वाह करीत होता. काल दिनांक ७ मे रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास बाजारपेठेत चक्कर येवून खाली पडला व छाती चोळू लागला. त्यास तात्काळ वाहनाने अमळनेर येथील खाजगी रुग्णालयात हलविले. डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. त्याचे प्रेत शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून अक्षय पाटील याच्या फिर्यादीवरून मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. महारू हा कष्टाळू तरुण मिस्तरी काम करून परिवाराचा उदरनिर्वाह चालवत होता. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई, वडील, बहीण असा परिवार आहे.







