मुंबई (प्रतिनिधी) – गृह विभागाने आज सोमवारी ८ रोजी दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये आयपीएस अधिकारी महेश पाटील आणि सुनिल कडासने या दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.


महाराष्ट्र एटीएसचे पोलीस उप महानिरीक्षक महेश पाटील यांची बदली ठाणे शहर पश्चिम प्रादेशिक विभागाच्या अप्पर पोलीस आयुक्तपदी करण्यात आली आहे. तर नागपूर लोहमार्ग पोलीस अधिक्षक सुनिल कडासने यांची बदली बुलढाणा पोलीस अधिक्षकपदी करण्यात आली आहे. राज्यात आणखीहि काही बदल्या होण्याची शक्यता मंत्रालयातून वर्तविण्यात आली आहे.







