जळगाव (प्रतिनिधी) – पाणी पिण्यासाठी झ-याकडे जाताच चोराने दागिने, रोख आणि मोबाईल असलेली विवाहितेची पर्स लांबवली. हा प्रकार शनिवारी सकाळी साडेदहा ते अकराच्या सुमारास चोपडा ते वैजापूर रोडवरील तेला घाटाखाली घडली.
मध्यप्रदेशातील नेपाल नंदा आर्य (३५, रा. दुगानी, ता. वरला, जि. बडवाणी) या पतीसोबत सकाळी साडेदहा ते अकराच्या सुमारास दुचाकीने (एमएच-४६-एमयू-६७८४) वैजापूर मार्गे चोपडाकडे जात होत्या. तेला घट संपल्यानंतर बोरअंजती गावाच्या अलीकडे पाण्याच्या झ-याजवळ आर्य दांपत्य पाणी पिण्यासाठी थांबले. तत्पुर्वी नेपाल यांनी सोन्याचे दागिने, मोबाईल आणि एटीएम असलेली पर्स दुचाकीच्या हँडलला अडकवली होती. दोघेही पाणी पिण्यासाठी जाताच संधीसाधू चोराने हँडलला अडकवलेली पर्स लांबवली. हा प्रकार लक्षात आल्यावर नेपाल यांनी चोपडा ग्रामीण पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. या पर्समध्ये एकुण ९७ हजार पाचशे रुपयांचा ऐवज असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. प्रकरणाचा पुढील तपास सहायक फौजदार देविदास ईशी करत आहेत.