जळगाव (प्रतिनिधी) – राम टोटल बॉडी चेकअप चे संचालक डॉ. प्रभू व्यास यांना नुकतीच पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली .डॉ प्रभू व्यास यांनी बेंगलोर येथून युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन चे एम.एस, व पोस्ट ग्रेज्युएट डिप्लोमा उत्तीर्ण केला. राय युनिव्हर्सिटी, अहमदाबाद येथून सेक्शुअल डिसऑर्डर या विषयावर त्यांनी पीएचडी पूर्ण केली आहे.
त्यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठचे पोस्ट ग्रेज्यूएट डिप्लोमा इन सायकॉलॉजीकल गाईडंस व कौन्सिलिंग पण उत्तीर्ण केले. .डॉ प्रभू व्यास यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स मध्ये सहभाग घेतला व रीसर्च पेपर प्रेझेन्ट केले. मुंबई चे भायखळाचे मसीना हॉस्पीटल, सीपीटेंकचे कोठारी हॉस्पीटल , व्ही. टी.
सी. एस .टी . कामा अँड अँब्लेस हॉस्पीटल ताडदेवचे भाटीया जनरल हॉस्पीटल येथे अनेक वर्ष सेवा केली. ते जळगाव ज्युनिअर चेंबर चे माजी अध्यक्ष आहे व रोटरी मेडिकल कमीटी चे माजी चेअरमन आहे त्यांनी विविध मधुमेह तपासणी शिबिर , हिमोग्लोबीन तपासणी, कोलेस्टेरॉल , लिपिड प्रोफाईल हृदयरोग तपासणी , डोळे तपासणी शिबिर आरोग्य तपासणी शिबिर ,रक्तदान शिबिर इत्यादि आयोजीत केले आहे.
पीएचडीच्या यशाबद्दल नानावटी सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल चे डॉ राज ब्रम्हभट,नागपूरचे डॉ संजय देशपांडे, हैदराबादचे डॉ रामन्ना,यांनी अभिनंदन केले. त्यांना सुप्रसिध्द डॉ रमेश पोतदार यांचे मार्गदर्शन मिळाले.