जैन इरिगेशनतर्फे दर वर्षी जागतिक केळी दिवस साजरा केला जातो. या दिनाच्या औचित्याने केळीचे महत्त्व सांगणारा, केळी विषयक जनजागृति करण्याचा कार्यक्रम तसेच नागरिकांना केळी वाटप करून हा दिवस साजरा केला जातो. या निमित्ताने खास लेख वाचकांसाठी देत आहोत…
आपल्या देशामध्ये केळी फळ अनेक शतकांपासुन उत्पादित केली जात आहे. गरिबांचे संपूर्ण अन म्हणूनच त्याच्याकडे पाहिले जाते. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार झाल्यापासून केळी पिकाचे व फळाचे महत्व मानवी आहारात मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पूर्वीच्या काळी केळी खाण्याबद्दल अनेक गैरसमज होते. परंतु पाश्चिमात्य देशांमध्ये केळी हे पहिल्या पसंतीचे फळ असल्याचे सर्वांना माहित झाल्यापासून लोकांमध्ये केळी खाण्याचा कल वाढला आहे.
केळी फळाचे पॅकिंग हे गॉडगिफ्टेड असल्यामुळे प्रवासात किंवा कुठेही केली. खाणे सोपे आहे. हे फळ अतिशय निर्जंतुक असल्याचे करोना काळात सिद्ध झाले आहे. पूर्वी केळी कार्बाइडचा वापर करून किंवा गोव-यांचा धूर करून पिकविली जात असे. परंतु आधुनिक रायपनिंग चेंबरची साखळी निर्माण झाल्यापासून व जगात सर्वमान्य अशा इथिलीन गॅस किंवा द्रावणाद्वारे नियंत्रित वातावरणात केळी पिकविण्याची पद्धत विकसित झाल्यापासून नागरिकांमध्ये जागरुकता आली आहे. पिवळी धम्मक व डाग विरहीत केळी म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने पिकवलेली केळी असे समीकरण आता रूढ झाले आहे. केळीच्या पौष्टीक गुणधर्माबद्दल सुद्धा जागरुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे जगभरात व भारतात केळी खाण्याचे प्रमाण गेल्या पंचवीस वर्षात तीन पटीने वाढले आहे. केळी खाण्याचे अनेक फायदे व त्याचे औषधी गुणधर्म सुद्धा खुप जास्त आहेत याबद्दल समाजात जागरुकता निर्माण होणे गरजेचे आहे.
केळ्यात सफरचंदापेक्षा सहा पट प्रोटिन्स, दोन पट कार्बोहाड्रेट, तीन पट फॉस्फरस, व्हिटॅमिन ‘ए’ आणि लोहाचे प्रमाण पाच पट अधिक असते.
बहुगुणी केळी:
केळ्यात सुक्रोज, फ्रुक्टोज व ग्लूकोज अशा तीन प्रकारच्या नैसर्गिक साखर असल्यामुळे केळी उर्जा देणारे शक्तीवर्धक बहुगुणी फळ आहे. केळ्यात ट्रिप्टोफॅन या अमिनो आम्लामुळे उत्साह मिळतो.
• लोहाचं अधिक प्रमाण असल्यामुळे हिमोग्लोबीन वाढते व अशक्तपणा दूर होतो.
भरपूर पोटॅशियम व अल्प क्षारामुळे रक्तदाबावर नियंत्रण होते. अधिकतम तंतुमय पदार्थामुळे पचन सुलभ होते. .
आम्ल विरोधी गुणांमुळे छातीतील जळजळ थांबते. व्हिटॅमिन ‘बी’ मुळे मज्जासंस्था यंत्रणा व्यवस्थित राहण्यासाठी मदत होते.
गरोदर मातांना एक शितफळ म्हणुन उपयोगी ठरतं. • परदेशात लहान बाळांसाठी केळी हे मुख्य ‘बेबी फुड आहे. .
खनिज व पोटॅशियमचे भरपूर प्रमाण म्हणूनच केळी हे एक बहुगुणी फळ आहे.