जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील सुभाषवाडी परिसरात घरासमोर उभी दुचाकी चोरल्याप्रकरणी मंगळवार, ४ एप्रिल रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील सुभाषवाडी येथे रविंद्र सावजी राठोड हे राहायला आहे, नेहमीप्रमाणे त्यांची (एम.एच. १९ सी एच ३०५३ ) या क्रमाकांची दुचाकी घरासमोर अंगणात उभी केली होती. ३० मार्च रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास अंगणात उभी दुचाकी दिसून आली नाही, सर्वत्र शोध घेवूनही दुचाकी मिळून न आल्याने चार दिवसानंतर रविंद्र राठोड यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला तक्रार दिली, या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक किशोर पाटील हे करीत आहेत.