चाळीसगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील पिलखोड येथे उपखेड फाट्याजवळ असलेल्या कापसाच्या गोडाऊनला दुपारी अचानक आग लागली. आगीत सुमारे २०० क्विटल कापूस जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. घटना शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. ग्रामस्थ आग विझविण्याचा प्रयत्न करीत असून अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले आहे.
कळवाडी ता.मालेगाव येथील व्यापारी दादा वाणी यांच्या मालकीचा हा कापूस असून त्यांचे मोठे आर्थिक नूकसान झाले आहे. जळालेल्या कापसाची किंमत जवळपास १५ लाख असल्याची माहिती मिळत आहे. नागरिकांनी अग्निशमन बंबाला बोलविले असून आग विझविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली आहे.