• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जैन इरिगेशनच्या कृषी तंत्रज्ञानाचा आविष्कार अनुभवताय राज्यभरातील शेतकरी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 9, 2023
in Uncategorized
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – जैन इरिगेशनच्या जैन हिल्स वरील कृषी संशोधन विकास केंद्रावर राज्यभरातील निमंत्रीत शेतकऱ्यांसाठी अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. यात राज्यभरातील व मध्यप्रदेशातील काही जिल्ह्यांमधील हजारो शेतकरी जैन हिल्सच्या कृषी संशोधन आणि प्रात्याक्षिक परिक्षेत्रावर भेट देत आहेत. आपल्या कष्टाला निरीक्षणातून तंत्रज्ञानाची जोड देत आहेत. जैन हिल्सवर आंतरराष्ट्रीय कांदा व लसूण परिषद दि. ११ ते १४ फेब्रुवारी २०२३ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. त्यापार्श्वभूमीवर दि. ५ ते २८ फेब्रुवारी दरम्यान शेतकऱ्यांसाठी अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले आहे. परिषदेच्या चार दिवस पंचक्रोषीतील निमंत्रीत शेतकऱ्यांनी जैन तंत्रज्ञान अभ्यासणे अपेक्षित आहे. जैन हिल्सच्या प्रात्यक्षिक परिक्षेत्रावर खरिप आणि रब्बी हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या ८२ प्रकारच्या विविध कांदाच्या जातींची लागवड करण्यात आली आहे. ड्रीप, मायोक्रो स्प्रिंकलर, रेनपोर्ट, रेनपाईपचा सिंचनासाठी केलेला वापर, यातून बहरलेली कांदा शेती शेतकरी अभ्यासत आहेत. सौर पंपाद्वारे पाणी पुरवठा करताना विहिरीवरील उघड्या जागेचा वापर करताना शेतकऱ्याचे हित कसे साधले जाईल, हे दाखविण्यात आले आहे. जैन ऑटोमेशनद्वारे फर्टिगेशन यंत्रणा, जैन न्युट्रीकेअर यंत्रणा कशी राबविता येईल. यातून वॉटर सोल्युबल खते देऊन शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीचा मार्ग कृषीतज्ज्ञ सांगत आहेत. पाणी व खते हे जमिनीस न देता पिकांना दिले पाहिजे यासाठी ठिबक सिंचनाच्या वापरातून खतांची कार्यक्षमता वाढत असते असे शेतकरी समजून घेत आहेत. केळीच्या जवळपास ३४ प्रकारच्या विविध जातींचा संशोधात्मक लागवड त्याला रानटी जनावरांपासून पिक संरक्षण कसे करता येईल, याची यंत्रणाही पाहता येत आहे. ग्रॅण्डनाईनमधील निवडक १४ जातींची लागवड याठिकाणी पाहता येईल. यातून शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंतीस उतरलेली टिश्यूकल्चर जैन ग्रॅण्डनाईन केळीसह इलाकी, पूवन, बन्थल मोन्थन, नेन्द्रन, रेड बनाना या टिश्यूकल्चरचा बाग शेतकऱ्यांना अभ्यासला. जैन स्वीट ऑरेंजच्या पाचही व्हरायटी यासह चिकू, पेरू, भगवा डाळिंब यासह अतिसघन लागवड पद्धतीने आंबा शेतीच्या फळबाग व्यवस्थापनातून समृद्धीचा मार्ग शेतकरी पाहत आहेत. अत्याधुनिक कांदा पेरणी यंत्र, कांदा काढणी यंत्र, बी लागवड यंत्र यासह कृषी उपयुक्त अवजारांची माहिती शेतकऱ्यांना उपयुक्त ठरत आहे. भविष्यात वाढती लोकसंख्या व उपजाऊ जमिनीचे घटत असलेले क्षेत्र पाहता भविष्यातील शेतीउपयुक्त जमिन कमी होऊ शकते. यासाठी भविष्यातील शेती, फ्युचर फार्मिंग शेतीकरी अभ्यासत आहेत. यामध्ये भाजीपालासह औषधी वनस्पतींचे उत्पादने घेण्यासाठी भिंतीवरची शेती म्हणजे व्हर्टीकल फार्मिंग, हायड्रोपोनीक शेती म्हणजे पाण्यातील शेती, एरोपोनीक शेती म्हणजे हवेत शेती, माती विरहीत शेती, वातारवण नियंत्रीत शेती पाहुन शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा मार्ग मिळत आहे. अभ्यास दौरामध्ये आकाश मैदानावर शेतकरी व जैन कृषितज्ज्ञ यांच्यामध्ये प्रश्नोत्तरांचे सत्र होत असते. यात बघितलेले तंत्रज्ञानाविषयी शेतकरी आपल्या शंकांचे निरसण करत आहे. जैन टिश्यूकल्चरमध्ये ग्रॅण्ड नाईन जातीमध्ये नंबर एक असलेला जैन टिश्यूकल्चर पार्क टाकरखेडा येथील १२५ एकर क्षेत्रात विस्तारित असलेल्या पॉलिहाऊस, ग्रीन हाऊसमध्ये केळी व डाळिंब टिश्यूकल्चर प्रायमरी हार्डनिंग, सेकंडरी हार्डनिंग त्यानंतर सर्व जातीवंत फळबागांसाठी लागणारे रोपे, कलमे त्यात प्रामुख्याने आंबा, जैन स्वीट ऑरेंज, पेरू, सिताफळ यासह भाजीपाल्याची रोपे यात प्रामुख्याने पपई, मिरची, कांदा, टोमॅटो, सॉईललेश बटाटा यांचे प्रात्याक्षिक शेतकरी अनुभवत आहेत.


 

 

Tags: #jain #jainirrigationjalgaon
Previous Post

पथराड येथे शेतकरी मेळावा उत्साहात

Next Post

महावितरण अधिकाऱ्यांमध्ये रंगला प्रदर्शनीय क्रिकेट सामना

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

महावितरण अधिकाऱ्यांमध्ये रंगला प्रदर्शनीय क्रिकेट सामना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हा परिषद सीईओ करिश्मा नायर यांची कानळदा येथील शाळा, अंगणवाडी व आरोग्य केंद्राला भेट
1xbet russia

जिल्हा परिषद सीईओ करिश्मा नायर यांची कानळदा येथील शाळा, अंगणवाडी व आरोग्य केंद्राला भेट

June 24, 2026
जळगाव जिल्हा पोलीस दलाची विशेष मोहीम; बेकायदेशीर मद्यपान आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोठी कारवाई
1xbet russia

जळगाव जिल्हा पोलीस दलाची विशेष मोहीम; बेकायदेशीर मद्यपान आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोठी कारवाई

June 24, 2026
चाळीसगाव शहर पोलिसांची धडक मोहीम; ४४ जण ताब्यात, धारदार शस्त्रांसह ३९ लाखांची वाहने जप्त
1xbet russia

चाळीसगाव शहर पोलिसांची धडक मोहीम; ४४ जण ताब्यात, धारदार शस्त्रांसह ३९ लाखांची वाहने जप्त

June 24, 2026
प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या
1xbet russia

टहाकळी येथील तरुणाची आत्महत्या; शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

June 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जिल्हा परिषद सीईओ करिश्मा नायर यांची कानळदा येथील शाळा, अंगणवाडी व आरोग्य केंद्राला भेट

जिल्हा परिषद सीईओ करिश्मा नायर यांची कानळदा येथील शाळा, अंगणवाडी व आरोग्य केंद्राला भेट

June 24, 2026
जळगाव जिल्हा पोलीस दलाची विशेष मोहीम; बेकायदेशीर मद्यपान आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोठी कारवाई

जळगाव जिल्हा पोलीस दलाची विशेष मोहीम; बेकायदेशीर मद्यपान आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोठी कारवाई

June 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon