पाचोरा ( प्रतिनिधी ) – पाचोरा – वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेतील इ.10 वी.च्या विद्यार्थ्यांसाठी निसर्गाच्या सानिध्यात शेतात एकदिवशीय स्काऊट शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.प्रथमतः सौ. वैशाली सुर्यवंशी यांच्या शुभहस्ते स्काऊट चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून एकदिवसीय शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
माननीय वैशाली सुर्यवंशी यांनी आपल्या मनोगतात स्काऊटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास चांगल्या प्रकारे साधता येतो तसेच शारीरिक व मानसिक विकासासाठी स्काऊट वेगवेगळे उपक्रम राबवित असते असे नमूद करून आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.
याप्रसंगी शाळेचे अध्यक्ष श्री. बाबुलाल हरी राठोड, प्राचार्या सौ.शोभा शिंदे,शिबिराचे आयोजक श्री. आर.एल. पाटील श्री.सुनील शिवाजी सावंत, सेनेच्या उपजिल्हा संघटिका तिलोत्तमा मौर्य, तालुका सेना समन्वयक श्री. ज्ञानेश्वर पाटील, युवा सेना उपजिल्हाप्रमुख श्री. संदीप जैन, श्री.नाना वाघ श्री. डी. डी. पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. वाल्मिक पाटील यांनी केले तर आभार श्री आर. एल. पाटील यांनी अभिव्यक्त केलेत.