भडगाव( तिनिधी ) – फोनवर धमकी देत सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला हॉटेलमध्ये नेवून तिच्यावर जबरी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत भडगाव पोलिसांकडून दिलेल्या माहितीनुसार, भडगाव तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह राहायला आहे. विजय दशरथ पाटील रा. भडगाव याने अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिच्याशी फोनवर बोलण्यासाठी धमकी दिली. तसेच फोनवरती बोलण्यास भाग पाडून तिला भडगाव शहरातील एका हॉटेलमध्ये घेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केला तसेच तिला बळजबरीने दुचाकीवर बसून पाचोरा रेल्वे स्टेशन येथे घेऊन गेला, त्याच्यानंतर पीडित मुलगी ही मामाकडे जळगाव येथे आली असता तिथे देखील तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, ही घटना घडल्यानंतर पीडित मुलीने भडगाव पोलिस स्टेशनला तक्रार दिली आहे. पीडित मुलीच्या तक्रारीवरून संशयित आरोपी विजय दशरथ पाटील रा. भडगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेच्या पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे करीत आहे.