जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील दूरदर्शन टॉवरजवळ झालेल्या अपघातात साहेबराव दारकू गवळी (वय ६०) रा. बेडी, ता.जि.जळगाव यांचा मृत्यू झाला आहे. या अपघातप्रकरणी रविवार, २२ जानेवारी रोजी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील दूरदर्शन टॉवरजवळ रविवारी दुपारच्या सुमारास अपघात झाला होता. या अपघातात साहेबराव गवळी हे जखमी झाले होते, त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचार सुरु असतांना त्यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या खबरीवरुन एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रतीलाल पवार हे करीत आहेत.