पाचोरा ( प्रतिनिधी ) – एम एम कॉलेज पाचोरा व ग्रामपंचायत खडकदेवळा यांच्या संयुक्त विद्यमानाने खडकदेवळा खुर्द गावामध्ये राष्ट्रीय सेवा योजना ( NSS) चे विशेष हिवाळी शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे. 17 जानेवारी ते 23 जानेवारी या कालावधीत हे शिबिर घेण्यात येत आहे. आज 22 जानेवारी रोजी सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पाचोरा च्या संचालिका व बालरोग तज्ञ डॉ सौ ग्रिष्मा पाटील यांनी शिबिरात महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. स्त्री आरोग्य व शिक्षण या विषयांतर्गत त्यांनी महाविद्यालयीन मुलींना मार्गदर्शन केले. 21 व्या शतकात वावरताना शिक्षणा सोबतच आरोग्याची कशी काळजी घ्यावी याबाबत त्यांनी उपयुक्त अशी माहिती दिली. एन एस एस शिबिरात येऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधल्याबद्दल एम एम कॉलेजच्या वतीने प्राध्यापक वळवी सरांनी डॉक्टर सौ ग्रिष्मा पाटील यांचे आभार मानले.