धरणगाव (प्रतिनिधी) – धरणगाव तालुक्यातील कल्याणे बुद्रुक येथील शिवारातून विहिरीतील पाण्याची मोटर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. याबाबत धरणगाव पोलीस स्टेशनला गुरुवारी १२ जानेवारी दुपारी १ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सुहास रमेशचंद्र धुप्पड (वय-५१) रा. दांडेकर नगर, जळगाव हे आपल्या परिवारासह राहायला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात त्यांचे कल्याणे बुद्रुक शिवारात शेत असून शेतातील विहिरीत पाण्याचे मोटार लावलेली आहे. गुरूवार ११ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेपासून ते १२ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी विहिरीत असलेली पाण्याची मोटार चोरून येण्याची उघडकीला आली आहे. याबाबत सुहास धुप्पड याने धरणगाव पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात दुपारी १ वाजता धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.