धुळे ;- तालुक्यातील जापी शिरडाने येथे दुर्धर आजाराने एकाच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह शहरातील जुने सिव्हिल रुग्णालय आवारातील शवगृहात सोपस्कर पार पाडत मृतदेह नातेवाईकांना सोपवण्यात आला. आज दुपारी सदर मृतदेह नातेवाईकांनी गावी नेला असता अंत्यसंस्कारआधी मुखदर्शन करताना नातेवाईकांसह ग्रामस्थांना जोरदार धक्का बसला. सदर मृतदेहाची अदलाबदल झाल्याचे समोर येताच नातेवाईकांनी धुळे गाठत संबंधितांना जाब विचारला. तर सदर व्यक्तीच्या मृतदेहावर यापूर्वीच अंत्यसंस्कार झाले असून हा मृतदेह सोनगीर येथील व्यक्तीचा असल्याचे समोर येत आहे. यामुळे रुग्णालय प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाटय़ावर आला असून यात दोषींवर कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.