जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात शनिवारी १७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता अज्ञात व्यक्तीविरोधात एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जळगाव तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह राहायला आहे. १६ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता अल्पवयीन मुलगी ही कुटुंबियासह रात्री झोपलेली असताना मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी फूस लावून पळवून नेले. हा प्रकार १७ डिसेंबर रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास लक्षात आला. मुलीच्या नातेवाईकांनी तिच्या सर्वत्र शोध घेतला ,परंतु ती कुठेही मिळून न आल्याने अखेर नातेवाईकांनी सायंकाळी ५ वाजता एमआयडीसी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे करीत आहे.