जळगाव (प्रतिनिधी) – येथील शिरसोली रस्त्यावरील श्री गुलाबराव देवकर कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच जळगाव येथील पोलिमेड फार्मासिटिकल प्रा. लि. या कंपनीला भेट देऊन औषधनिर्माण शास्त्राची माहिती करून घेतली.
यावेळी विद्यार्थ्यांना कंपनीची माहिती सरव्यवस्थापक श्री सुनील यांनी विद्यार्थ्यांना करून दिली. यात औषधनिर्माणची प्रक्रिया, त्यात वापरले जाणारे विविध ड्रग्स व पॅकिंग संदर्भातील माहिती विद्यार्थ्यांनी जाणून घेतली.
यावेळी प्रा राहुल पाटील, प्रा. अमोल पवार यांच्या मार्गदर्शनात एकूण 58 विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक विजिटमध्ये सहभाग घेतला. अशा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष व जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर, विशालदादा देवकर व प्रा योगेश पवार यांनी प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.