पहूर ( प्रतिनिधी ) – जामनेर तालुक्यातील एका गावात राहणारी अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत पहूर पोलीस स्टेशनला एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पहूर पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह राहायला आहे. त्याच गावातील राहणारा संशयित आरोपी जगदीश अशोक पवार याने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार सहन न झाल्याने पीडित मुलीने हा प्रकार नातेवाईकांना सांगितला. यासंदर्भात पहूर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून शुक्रवार १८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता संशयित आरोपी जगदीश अशोक पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील करीत आहे.