धरणगाव ( प्रतिनिधी ) – धरणगाव तालुक्यातील चांदसर येथून एकाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मंगळवारी धरणगाव पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीवरून , गणेश नारायण भांडारकर (वय-५२) रा. चांदसर, ता.धरणगाव हे आपल्या कुटुंबियांसह राहायला आहे. खासगी नोकरी करतात. १० नोव्हेंबर रोजी त्यांची दुचाकी क्रमांक (एमएच १४ बीएल १३७८) चांदसर शिवारात लावलेली होती. अज्ञात चोरट्यांनी २५ हजार किंमतीची दुचाकी चोरून नेल्याचे समोर आले. त्यांनी परिसरात सर्वत्र दुचाकीचा शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर मंगळवारी १५ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता धरणगाव पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अरूण निकुंभ करीत आहे.