जळगाव (प्रतिनिधी) – जगण्याची शाश्वती नव्हती इतका मोठा अपघात झाला अशा कठीण परिस्थितीतून जात असताना धर्म व गुरूबद्दल अफाट श्रद्धा असलेले गोटु शेठ यांचे आम्हाला कौतुक आहे. जगलो- वाचलो तर माझ्या गुरुणीसा यांचे दर्शन करण्यासाठी 40-50 जणांचा संघ घेऊन येईल हा संकल्प पूर्णत्वास येतो ही मोठी पुण्यवाणी आहे, अशा शब्दात डॉ. ज्ञानप्रभाजी म.सा. यांनी नरेंद्र अर्थात गोटू भाऊ बंब यांचे कौतुक केले. बंब परिवाराच्या पुढाकाराने जळगाव येथून सुमारे ४५ श्रावक-श्राविकांला संघ पुणे वडगांवशेरी येथे आणून आपला संकल्प पूर्ण केल्याबद्दल वडगांव शेरी श्री संघाच्यावतीने वडगावशेरी वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष शांतीलाल बोरा यांच्या हस्ते गोटू भाऊ बंब यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नरेंद्र जैन, किशोर कुलकर्णी, ताराबाई डाकलिया व ताराबाई रेदासनी यांनी मनोगत व्यक्त केले.
गोटू भाऊ बंब यांची संत-साध्वींसाठी बिहार सेवा सर्वश्रुत आहे. स्वतः व इतरांना ही सोबत घेऊन ते विहार सेवा देत असतात. संघपती दलुभाऊ जैन, सुरेशदादा जैन, अशोकभाऊ जैन, प्रदीपभाई रायसोनी, ईश्वर बाबुजी, बाफनाजी यांच्या मार्गदर्शनानुसार इतका मोठा संघ पूज्य डॉ ज्ञानप्रभाजी म.सा. यांच्या दर्शनार्थ आणणे मोठे कठीण काम होते. सर्व अडचणींवर मात करून ८ रोजी सायंकाळी महाराष्ट्र जळगाव येथून पुणेकडे श्री संघ मोठ्या उत्साहात रवाना झाला. पहाटे पोहोचल्यावर सवचन, धर्मचर्चा गुरुणीसाजीले दर्शन घेऊन सर्वांनी वंदन नमन केले.
पुणे 1 दिवसीय संघ यात्रा कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र प्रवर्तिनी परम पूज्य साध्वी ज्ञान प्रभाजी म.सा आदि ठाणा – 9 (वडगाव शेरी, पुणे.), परम पूज्य साध्वी प्रियदर्शनाजी म.सा आदि ठाणा – 6 (धनकवडी, पुणे.), साध्वी डॉ. विजयश्रीजी ‘आर्या’ आदि ठाणा 6
(कात्रज-कोंढवा रोड, पुणे) यांचे दर्शन व प्रवचनाचा लाभ सर्व सदस्यांना घडला. याशिवाय दगडूशेठ हलवाई गणपती देवस्थानचे दर्शन देखील सर्व सदस्यांनी घेतले. ही यात्रा आयोजित करण्याबद्दल सहभागी सदस्यांनी बंब परिवाराचे आभार मानले. ह्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनेकांनी परिश्रम घेतले.