सावदा ( प्रतिनिधी ) – रावेर तालुक्यातील रोझोदा शिवारातील शेतातून महावितरण कंपनीचे सहा हजार रुपये किमतीचे अल्युमिनियमचे तार चोरी केल्याप्रकरणी सावदा पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सावदा पोलिसांनी दिलेली माहितीवरून , रावेर तालुक्यातील रोझोदा शिवारातील विजय रावजी नेहते यांच्या शेतात असलेल्या लोखंडी खांब्याजवळ महावितरण कंपनीचे सहा हजार रुपये किमतीचे अल्युमिनियमचे तार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे ३० ऑक्टोबर रोजी सकाळी समजले. यासंदर्भात महावितरण कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञ गोरख रामचंद्र बेलदार ( वय – 34, रा. सावदा, ता. रावेर ) यांनी सावदा पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस नाईक विनोद तडवी करीत आहे.