चोपडा ( प्रतिनिधी ) – धडगाव तालुक्यात असलेल्या एका गावात लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत चोपडा पोलीस स्टेशनला तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील एका गावात राहणारी सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबीयांसह राहायला आहे. दोन महिन्यांपूर्वी गणेशोत्सवा दरम्यान संशयित आरोपी विलेश दारासिंग पावरा, रा. दोंदवाडे, ता.शिरपूर, जि. धुळे याने पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवत तिला घरातून फूस लावून पळवून नेत नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात असलेल्या एका गावात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार घडल्यानंतर अल्पवयीन मुलगी घरी येऊन तिच्यावर झालेल्या अतिप्रसंगाबद्दल तिला सांगितले. तिच्या नातेवाईकांसह पिडीता यांनी चोपडा शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी विलेश दारासिंग पावरा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण करीत आहे.