जामनेर (प्रतिनिधी) – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत जामनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते राहुल चव्हाण व राष्ट्रवादीचे ज्ञानेश्वर बोरसे यांच्यासह अनेकांचा दिपकसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश.
उत्तर महाराष्ट्र समन्वयक रविंद्र मिरलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना जिल्हाप्रमुख दिपकसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज शिवसेना भवन येथे वंदन मातृभूमी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते राहुल चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते ज्ञानेश्वर बोरसे, प्रहारचे विधानसभा क्षेत्र प्रमुख जीवन सपकाळे, नरेंद्र धुमाळ, विशाल माळी, मनोज मिस्तरी, मिलिंद सपकाळे, अर्जुन राठोड यांच्यासह अधिक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना सह – संपर्क प्रमुख मनोहर पाटील, जिल्हा संघटक गजानन मालपुरे, युवासेना जिल्हाप्रमुख चंदू शर्मा, शिवसेना शहर प्रमुख पवन माळी, विधानसभा क्षेत्र प्रमुख नीलकंठ पाटील इतर शिवसैनिक उपस्थित होते.