रावेर( प्रतिनिधी ) – रावेर तालुक्यातील पाल येथे राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला एकाने फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, रावेर तालुक्यातील पाल येथे १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबीयांचा राहायला आहे. १७ ऑक्टोबर रोजी रात्री ११ ते १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ३.३० वाजेच्या सुमारास गावात राहणारा सुलेमान गंभीर तडवी याने अल्पवयीन मुलीला घरातून फूस लावून पळून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. घरातील नातेवाईकांनी मुलीचा सर्वत्र शोध घेतला. परंतु मुलगी कुठे मिळून न आल्याने अखेर १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता रावेर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी सुलेमान गंभीर तडवी याच्या विरोधात रावेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक दिपाली पाटील करीत आहे.