वरणगाव (प्रतिनिधी) – हरविलेले क्रेडिट कार्ड ब्लॉक करून देते असे सांगून अज्ञान महिलेने शेतकऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर १ लाख १६ हजार ४२१ रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली आहे. याबाबत वरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांकडून दिलेली माहिती नुसार, अनिल प्रभाकर वंजारी ( वय ५२) रा. वंजारीवाडा, वरणगाव, ता. भुसावळ हे आपल्या कुटुंबियांसह राहायला आहे. शेती करून आपला घरखर्च चालवितात. २१ सप्टेंबर दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्यांना त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी महिलेने फोन करून एसबीआय बँकेतून बोलते असे सांगून तुमचे हरविलेले क्रेडिट कार्ड ब्लॉक करून देते असे सांगितले. त्यावर महिलेने अनिल वंजारी यांचा विश्वास संपादन केला. त्यानुसार अनिल वंजारी यांनी त्यांच्या मोबाईलवर आलेला गोपनिय असलेला ओटीपी नंबर दिल्याने काही वेळातच त्यांच्या बँक खात्यातून १ लाख १६ हजार ४२१ रुपये परस्पर काढून घेतल्याचे अनिल वंजारी यांच्या लक्षात आले. त्यांनी या संदर्भात तातडीने वरणगाव पोलीसस्टेशनला तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील करीत आहे.








