जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावातील वाघुर कॉलनीत शेतकऱ्याचे बंद घर फोडून घरातून सोन्याचे दागिने व रोकड चोरली आहे. या संदर्भात शुक्रवारी नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांकडून दिलेली माहिती नुसार, चंद्रकांत देविदास पाटील (वय-३४) रा. वाघुर कॉलनी, खलची अळी, नशिराबाद ता. जळगाव हे आपल्या कुटुंबीयांचा रहायला आहे. शेती करून आपले घर खर्च चालवितात १४ ऑक्टोबर रोजी सकाळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे बंद कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण १ लाख ६९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेले आहे. या संदर्भात चंद्रकांत पाटील यांनी नशिराबाद पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे करीत आहे.