जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील सदाशिव नगरात राहणाऱ्या तरुणाने कौटुंबिक वादातून विषारी औषध घेतले होते. रात्री त्याचा मृत्यू झाला. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, भूषण पाटील (वय-३६) रा. शेळगाव ता. जि. जळगाव ह. मु. सदाशिव नगर जळगाव हा पत्नी हर्षा व दोन मुलांसोबत राहायला होता. वेल्डिंगचे काम करून आपला घरखर्च चालवत होता. दरम्यान बुधवारी १२ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घरात झालेल्या कौटुंबिक वादातून त्याने सेल्फॉक्स नावाचे विषारी औषध घेतले. त्याची प्रकृती खालावल्याने त्याच्या नातेवाईकांनी त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान रात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या संदर्भात शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. मयताच्या पश्चात पत्नी हर्षा, मुलगा ओम आणि साई असे नावे आहेत. पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय मराठे करीत आहे.