धरणगाव ( प्रतिनिधी ) – पिंप्री खुर्द येथून सात वर्षीय मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे सात वर्षाची मुलगी आपल्या कुटुंबियांसह राहायला आहे. शुक्रवार ७ ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने सात वर्षाच्या चिमुकली खेळत असतांना अपहरण केल्याचे समोर आले. मुलीच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला परंतू ती कुठेही मिळून आली नाही. अखेर मुलीच्या वडीलांनी धरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ उमेश भालेराव करीत आहे.