पारोळा (प्रतिनिधी ) – जळगाव जिल्हा खाजगी माध्यमिक शिक्षकेतर संघटना व धनराज विसपुते फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने जळगाव जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना नुकताच जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला ,यात पारोळा तालुक्यातील डॉ. व्ही एम.जैन माध्यमिक विद्यालयातील लिपिक दिपक गुरुदास भावसार यांची निवड करण्यात आली.
विद्यालयातील २३ वर्षे सतत सेवा तसेच तालुक्यातील व शहरातील सामाजिक कार्य पाहता हा पुरस्कार दिला जाणार आहे. ह्या पुरस्काराचे वितरण ९-१०-२२ रोजी मंगलग्रह मंदिर अमळनेर येथे दुपारी एक वाजता सतीशजी नाडगौड महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शिक्षकेतर संघटना यांच्या अध्यक्षतेखाली तर डॉ. नितीन बच्छाव शिक्षणाधिकारी माध्यमिक विकास पाटील शिक्षणाधिकारी प्राथमिक चारुशीला चव्हाण, जेके पाटील, एच.डी भिरुड ,उदय पाटील, दिगंबर महाले, मिलिंद जोशी, यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
दिपक भावसार यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यु एच करोडपती, तालुक्याचे,आमदार चिमणराव पाटील ,माजी पालकमंत्री डॉ. सतीश बी पाटील, माजी खासदार ए टी पाटील, नगराध्यक्ष करण पवार ,शहर विकास आघाडी प्रमुख गोविंद शिरोळे ,संस्थेचे सचिव डॉ. सचिन बडगुजर ,विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय बडगुजर बालाजी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक हेमंत कुमार पाटील, यांच्यासह गोरख पाटील, पारोळा तालुका शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष विनोद पाटील ,योगेश पाटील ,सचिव प्रसाद नावरकर ,व सर्व पदाधिकारी सभासद तसेच बालाजी शैक्षणिक संकुलातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.