जळगाव ( प्रतिनिधी ) तालुक्यातील शिरसोली प्र. बो. येथील एका २८ वर्षीय तरुणाने राहत्या घरात दोरीनी गळफास घेत आपले जीवन संपविल्याची दुर्दैवी घटना आजा दुपारी १ वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे. शांताराम राजू पाटील वय २८ असे मयत तरुणाचे नाव आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , शिरसोली येथील इंदिरा नगर परिसरात राहणाऱ्या शांताराम पाटील हा मिस्त्रींचे काम करीत असून याला पत्नी धनश्री पाटील असून एक मुलगा आणि पत्नी हि माहेरी गेली असल्याने घरी कुणी नसल्याने घराच्या छताच्या हुकला दोरी बांधून त्याने दुपारी १ वाजेच्या सुमारास आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला . शेजारी राहणाऱ्या मुलीच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर तिने तातडीने आजबाजूच्या नागरिकांना सांगितला.
.त्याला एक भाऊ आणि बहीण आहे. . घटनेची माहिती कळताच नागरिकांनी मयत शांताराम राजू पाटील याला जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात नेले असता त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. खानेता पठाण यांनी त्यास मयत घोषित केले. यावेळी रुग्णालयामध्ये कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला आहे. दया घटनेबाबत एमआयडीसी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते.